Maharashtra rain update ; यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडी नाहीतर पावसाचा अंदाज.
Maharashtra rain update ; यंदाचा नोव्हेंबर महिना थंडीचा नाही तर पावसाचा असणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात राज्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून, राज्यात या महिन्यात थंडी कमी असेल. याचबरोबर, देशातील अनेक भागांतही किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी नोव्हेंबर महिन्याचा अंदाज सादर केला. त्यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यात वायव्य भारताचा काही भाग वगळता देशाच्या अनेक भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. राज्यात किमान तापमान अधिक राहणार असल्याने नोव्हेंबर महिन्यात फारशी थंडी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.












